Skip to main content

Posts

फोटो: कट्टा (९,१०, ११) दिनांक १७, ३१ मे, ७ जून, १४ जून २०२६

दिनांक १७ मे २०२६ रोजी श्री.  प्रकाश माळी व श्री. जगताप वाचन कट्टा उपक्रमाला शहीद करकरे उद्यान येथे आले होते. नवीन वाचकांना भेटले. त्यांनी या उपक्रमात सातत्य ठेवले आहे. दिनांक ३१ मे २०२६ श्री. जगताप यांनी पुरेसा प्रतिसाद नसतानाही वाचनाचा उपक्रम खंड पडू न देता चालू ठेवला.  दिनांक ७ व १४ जून २०२६: 
Recent posts

कट्टा ८: अहवाल

 आज 8 ते 9.30 असे दीड तास वाचन केले. अनेक नवीन सदस्य भेटले. थोड्या गप्पा झाल्या. एरवी चालायला गेल्यावर अनोळखी कोणी कोणाशी बोलत नाही. पण पुस्तक हा असा दुवा आहे जो लोकांना जोडत आहे, हा एक अनुभव येतोय. क्षणचित्रे टिपली नाहीत. एक प्रातिनिधिक फोटो आहे. 

कट्टा ७: काही क्षणचित्रे

कट्टा ६: अहवाल

करकरे उद्यान, गोंधळेनगर याठिकाणी आजचा ६ वा रविवार वाचन  कट्ट्यावर येवून १७ लोकांनी वाचन केले.  ओळखी झाल्या. चर्चा झाली. या उपक्रमाचे महत्व अनेक लोकांनी अधोरेखित केले. वेगवेगळ्या स्तरावर वाचन वृद्धिंगत व्हावे म्हणून कार्यरत लोक भेटत आहेत. आपापल्या भागात या कट्ट्याच्या शाखा सुरु करण्याचे ठरले. लहान मुले आनंद घेत आहेत. ५-६ लोकांचा असलेला whatsapp ग्रुप आज ४५ + झाला आहे. 

कट्टा ५: अहवाल

  वाचक पुस्तके पाहताना, चर्चा करताना. 

कट्टा ४: अहवाल

संविधान वाचून कट्ट्याचा आज चौथा रविवार. वाचन चर्चा किलबिल पार्टीची पुस्तकांसाठी उडालेली झुंबड असे सगळे आज अनुभवायला मिळाले. नवीन सदस्य जोडले गेले. 

कट्टा ३: अहवाल

या रविवारी संविधान जागर अभियानाचे कार्यकर्ते संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. तरीदेखील पुस्तक वितरक श्री संतोष देडे यांनी हा वाचन कट्ट्याचा उपक्रम सुरू ठेवला आणि या उपक्रमाला खंड पडू दिला नाही. उत्तम प्रतिसाद मिळाला.