आज या वाचन कट्ट्याचा पहिलाच दिवस. करकरे उद्यान गोंधळेनगर, हडपसर या ठिकाणी हडपसर वाचन कट्ट्याला केदार सर, प्रकाश माळी सर, संतोष देडे, दत्तात्रय संकपाळ, जगताप सर आम्ही ५ जण सकाळी ठीक ८ वाजता जमलो. येताना प्रत्येकाने ५-६ पुस्तके सोबत आणली होती. ती पुस्तके आलेल्या ग्रामस्थांनी, मुलांनी आवडीने घेतली. बघता बघता सुमारे १५ ते २० वाचक झालो. त्यांनी या उपक्रमात पुढील रविवारी सहभागी होण्याचे आश्वासन दिले. ९.१५ वाजता वाचन थांबवून आम्ही केलेल्या वाचनाबद्दल एकमेकांना अनुभव कथन केले. छत्रपती संभाजी महाराजांचे बुधभूषण, गेल ऑम्लेट यांचे ह्यो तुरुंग फोडायचा हाय ग, तारा भवाळकर यांचे सीतायन, बाल साहित्यामध्ये चार्ली चापलीन, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, कॉमिक्स अशी पुस्तके वाचली गेली. संतोष देडे (वितरक) यांनी पुस्तकांचे छोटेसे प्रदर्शन उद्यानासमोर ठेवले होते. अनेक वाचकांनी प्रदर्शनालाही भेट दिली. असाच हा समूह वाढत जाईल आणि एक मोठी वाचन चळवळ यातून उभी राहील, असा आशावाद आजच्या प्रतिसादाने वाटतो.

.jpeg)
Comments
Post a Comment